या चार स्तंभांद्वारे आम्ही उद्योजकांचे सशक्तीकरण करतो.
Self-Mastery (स्वतःवर प्रभुत्व )
तुमची ऊर्जा, शिस्त आणि निर्णय तुमच्या मुख्य उद्देशाच्या पूर्ततेसाठी सुनियोजित करणे. तुमची व्हायब्रेशन्स उंचावून तुम्हाला यशासाठी तयार करणे.
Sales Mastery (जबरदस्त सादरीकरण)
प्रामाणिकपणे आणि स्पष्टतेने योग्य ग्राहकांना आकर्षित करणे, प्रभावित करणे आणि त्यांचे निष्ठावंत ग्राहकांमध्ये रूपांतर करणे.
Branding Mastery (चिरकालीन अस्तित्व)
तुमच्या मार्केट मध्ये विश्वासार्ह, प्रीमियम व पिढ्यानपिढ्या अस्तित्वात राहणारा ब्रँड निर्माण करणे.
Business Mastery (शाश्वत स्वराज्य )
सिस्टिम्स, प्रोसेसेस, टेकनॉलॉजी व ऑटोमेशन च्या मदतीने सतत वृद्धिंगत होणार शाश्वत बिझनेस निर्माण करणे.
व्हायब्रेशन → निर्मीतीशक्ती → स्वराज्य
विश्वात प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट कंपनात (नादात) व्हायब्रेट होत असते.जेंव्हा तुमचा नाद एका विशिष्ठ फ्रेक्वन्सी मध्ये व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते, तेंव्हा ब्रम्ह किंवा निर्मितीची शक्ती तुम्हाला शक्ती देते, त्या निर्मितीच्या शक्तीतून तुमचे स्वराज्य (ज्या उद्दिष्ठासाठी तुम्हाला पृथ्वीवर पाठवले आहे) साकारायला सुरुवात होते कारण त्या स्वराज्याला त्या निर्मितीला शिवरायांचा आशीर्वाद आहे.
शाश्वत स्वराज्य ही समविचारी उद्योजकांची चळवळ
शाश्वत स्वराज्य ही समविचारी उद्योजकांची चळवळ आहे जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रष्टेपणा आणि आधुनिक व्यवसाय तत्वज्ञान एकत्र येतात.
आमच्या २५ वर्षाच्या अनुभवावरून एक गोष्ट लक्षात आली,आपल्या बहुतेक समस्यांचे मूळ हे आपल्या ध्येयांची व्हायब्रेशन आणि आपली व्हायब्रेशन ह्यातली तफावत हे आहे. शाश्वत स्वराज्यातला प्रत्येक उपक्रम उद्योजकांचे व्हायब्रेशन्स उंचावून त्यांना आयुष्यात येणारी आव्हाने व मोठ्या संधी शोधून त्यांचे सोनं करण्यासाठी तयार करतो.
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा व्हायब्रेशन उंचावली कि समस्या अक्षरशः लुप्त होतात व कधीही कल्पना केले नाही असे यश उद्योजक अनुभवू लागतात.आत्मविश्वस वाढतो, सातत्य वाढते बिझनेस वाढतो, नफा वाढतो आणि सगळ्यात महत्वाचे समाधान आणि योगदान वाढते,
हे साध्य करण्याची सगळ्यात सोप्पी पद्धत म्हणजे आपल्या आत पिढ्यानपिढ्या अस्तित्वात असलेल्या शिवप्रेरणेला प्रज्वलित करून तिचे वणव्यात रूपांतर करणं, आपणच निर्माण केलेल्या काल्पनिक अडथळ्यांना ह्या वणव्यात भस्मसात करणं.
ह्यासाठी आपण शाश्वत स्वराज्य हि एक जबरदस्त इकोसिस्टिम निर्माण केली आहे जिचा भाग बनून तुम्ही तुमचे शाश्वत स्वराज्य उभारू शकता.
आमचे उद्दिष्ठ
१९ फेब्रवारी 2030 (शिवरायांची ४०० वी जयंती) पर्यंत ४०० हुन अधिक उद्योजकांना ₹५ कोटी + चा टप्पा पार करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
आमचा स्वराज्य धर्म
(मूलभूत तत्वे ज्यांच्याशी आम्ही कधीही तडजोड करत नाही).
स्वातंत्र्य
तुम्हाला जे हवंय,जे मनापासून करावंसं वाटतंय तेच करण्याचे स्वातंत्र्य.
सातत्य
महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊन त्या सतत करून,स्वतःमध्ये व व्यवसायात आमूलाग्र बदल घडवणं.
सेवा
संभाव्य ग्राहकाची स्वप्न,समस्या व ध्येय ह्यांना सर्वोच्च प्राधान्य देणे.
शाश्वत स्वराज्याचे चार मूलभूत स्तंभ
व्यवसाय नशिबावर उभा राहत नाही.तो नियोजन,सिस्टिम्स आणि व्हायब्रेशनवर उभा राहतो.
1.सेल्फ मास्टरी
- स्वतःला समजून घेऊन, शिस्त, स्पष्टता आणि सातत्याने गती निर्माण करा.
- पर्पज डिस्कव्हरी, ध्येय निश्चिती आणि मॉर्निंग रिच्युअलद्वारे आतून सक्षम बना.
- स्पष्ट दिशा, प्रॉडक्टिव्हिटी, मानसिक शांतता आणि योग्य संधी आकर्षित करा.
2. सेल्स मास्टरी
- आदर्श ग्राहक ओळखून त्यांच्याशी विश्वास निर्माण करणे.
- प्रभावी फनेल, प्रेझेंटेशन्स व कन्टेन्टद्वारे विक्री वाढवणे.
- ९० दिवसांत दुप्पट रेव्हेन्यू आणि ग्राहक संबंध सुधारणा.
3. ब्रँडिंग मास्टरी
- आकर्षक ब्रँड आणि व्हिज्युअल आयडेंटिटी तयार करणे.
- कम्युनिटी, स्टोरी टेलिंग आणि इमेज बिल्डिंगद्वारे विश्वास निर्माण करणे.
- सातत्यपूर्ण लीड्स, प्राईज कंट्रोल आणि मजबूत बाजारातील ओळख मिळवणे.
4. बिझनेस मास्टरी
- सिस्टिम्स, प्रोसेस आणि टेक ऑटोमेशनने स्केलेबल व स्वयंपूर्ण व्यवसाय निर्माण करणे.
- SOPs, AI व इतर टूल्सने कार्यक्षमतेत वाढ करणे.
- डॅशबोर्डद्वारे व्यवसायाची प्रगती व वाढ ट्रॅक करणे.
शाश्वत स्वराज्य का ?
आमचे संस्थापक,केतन गावंड,यांनी सेल्स, मार्केटिंग,ब्रँडिंग,ट्रेनिंग आणि कोचिंगमध्ये 25+ वर्षे घालविली,4 लाखांहून अधिक व्यावसायिकांना मार्गदर्शन केले आणि 50+ कॉर्पोरेट्स आणि 50+ सरकारी संस्थांना नेतृत्व आणि उत्पादकता वाढविण्यात मदत केली.
आमच्या को-फाऊंडर अमृता मोरे ह्यांनी १ ८ पेक्षा जास्त वर्ष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उद्योजकांचे आयुष्य सोपं करण्यावर भर दिला ,त्यांना एक गोष्ट प्रकाशाने जाणवली ९५ % उद्योजक कधीच ₹1 कोटी उलाढाल कधीच पार करत नाहीत आणि ह्याचं मूळ कारण योग्य वातावरण, योग्य मार्गदर्शन आणि योग्य कृतीचा आभाव.
ह्याच उणिवा दूर करण्यासाठी उद्योजकांना शाश्वत असा ५ कोटींचा व्यवसाय उभारण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना मार्गदर्शन देऊन,प्रोत्साहित करून ,योग्य सपोर्ट सिस्टिम निर्माण करून आणि गरज पडल्यास त्यांना आवाहन देऊन सतत प्रगतिशील राहण्यासाठी शाश्वत स्वराज्य अस्तित्वात झाल.
शिवाजी महाराजांंचा वारसा का महत्त्वाचा आहे?
छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजा नव्हते—ते धोरणकर्ते,दूरदृष्टीचे आणि संसाधनांचे मास्टर होते.त्यांची तत्त्वे: स्पष्ट उद्देश आणि अढळ दृष्टी,लोक-प्रथम नेतृत्व, अनुकूल नावीन्य—ही थेट शाश्वत स्वराज्य व्यवसाय वृद्धी प्रणालीत समाविष्ट आहेत.
चळवळीत सामील व्हा.तुमचे स्वराज्य उभारा.
पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं, ताकदीवर नाही तर सातत्यावर.
तुमच्या सातत्यपूर्ण प्रगतिशील प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
तंत्रज्ञानाची साथ, व्यवसायाची वाढ
जेथे परंपरा तंत्रज्ञानाशी भेटते.
आधुनिक टूल्स तुमच्या व्यवसायात वापरा,जेणेकरून तुमची ओळख आणि संस्कृती जपून तुम्हाला भविष्याची तयारी करता येईल.
AI आधारित माहिती, ऑटोमेशन, LMS प्लॅटफॉर्म, CRM आणि फनेल सिस्टम.
वेळ वाचतो, खर्च कमी होतो, कामाची अचूकता आणि गती वाढते,आणि तुम्ही रोजच्या कामांपेक्षा नाविन्यपूर्ण गोष्टींवर लक्ष देऊ शकता.
About Us
शाश्वत स्वराज्य ही समविचारी उद्योजकांची चळवळ आहे जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रष्टेपणा आणि आधुनिक व्यवसाय तत्वज्ञान एकत्र येतात.
Contact
- +91 9619313034
- +91 8605722538
- shashwatswarajya@gmail.com